फलज्योतिषावर शोधज्योत
फलज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेक लोकांचा विश्वास असतो. त्याचे उदाहरण म्हणून कधी काळी कोणीतरी सांगितलेले खरे ठरलेले भाकित लोक सांगतात. पण त्यानेच किंवा इतरांनी सांगितलेली शेकडो चुकीची ठरलेली भाकिते ते सोइस्करपणे विसरून जातात. वास्तविक खरेपणा खोटेपणा ठरविण्यासाठी खरी आणि खोटी दोन्ही भाकिते लक्षात घेतली पाहिजेत. फलज्योतिष सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाश्चात्य, भारतीय, चिनी …